
दीड महिन्यानंतरही अधिपारिचारिका न्यायाविना
अलिबाग, ता. ५ (बातमीदार) : अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या अधिपरिचारिकांनी १८ महिन्यांचे शासकीय नियुक्ती मिळावी, यासाठी २१ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला ४६ दिवस उलटून गेले, तरी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे. उपोषणाला दीड महिने होऊनही अधिपरिचारिका न्यायाविनाच असल्याचे दिसून आले आहेत.
अधिपरिचारिकांनी समाज क्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये अधिपरिचारिका भाग्यश्री पाटील व प्रणाली भोसले सामील झाल्या आहेत. २०१७ मध्ये अधिपरिचारिकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना १८ महिन्यांचे शासकीय नियुक्तीचे आदेश देणे बंधनकारक असताना रुग्ण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या उपोषणाला ४६ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. १५ मेपर्यंत सरकारने हा प्रश्न निकाली काढला नाही, तर समाजक्रांती आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
------------
अधिपरिचारिकांना शासकीय सेवेत घेण्याबाबत दीड महिन्यापासून उपोषण सुरू केले आहे. मात्र, प्रशासनासह आरोग्य विभागाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे भविष्यात न्यायासाठी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. सरकारने १५ मेपर्यंत न्याय द्यावा; अन्यथा पुढील राज्यस्तरीय आंदोलनाची भूमिका महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात येईल.
- बी. जी. पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष, समाज क्रांती आघाडी
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35505 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..