
महिलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण
अलिबाग, ता. ७ (बातमीदार) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रायगड क्रिकेट स्पोर्टस् आणि वेल्फेअर असोसिएशन यांच्यातर्फे महिलांसाठी सात दिवसांचे मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. आदिती दळवी यांच्या अध्यक्षतेखाली २० मेपासून पनवेल येथे हे शिबिर होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व गटांमधील महिलांना या शिबिरामध्ये प्रवेश दिला जाईल. यात तज्ज्ञ मार्गदर्शक खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी खेळाडूंमधून महिलांचे विविध गटांचे संघ निवडण्यात येतील. त्यांचे सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. यासाठी आदिती दळवी, संदीप पाटील, विनय पाटील, सुहास हिरवे, सुमीत झुंजारराव, प्रीतम कय्या, महेश देशमुख परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी संदीप पाटील ७२०८१८५६१३, ८३६९७८९३८५, प्रीतम कय्या ९३२२२४३५३४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35518 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..