सप्रेम नमस्कार सदरासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्रेम नमस्कार सदरासाठी
सप्रेम नमस्कार सदरासाठी

सप्रेम नमस्कार सदरासाठी

sakal_logo
By

सप्रेम नमस्कार सदरासाठी
***
प्रति,
सप्रेम नमस्कार, दैनिक सकाळच्या टुडे रायगड आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झालेली ''रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग'' ही बातमी वाचली. आपण माझ्या मनातले विचार मांडले आहात. मनःपूर्वक अभिनंदन. विन्हेरे गावातील कचऱ्याच्या ढिगाबद्दल मी स्वतः व्यथित आहे. गेल्या वर्षी दोन जणांना सोबत घेऊन विन्हेरे गावाच्या दोन्ही बाजूने वाहणाऱ्या नद्यामधला कचरा गोळा केला होता. तो कचऱ्याची तिथल्या तिथे विल्हेवाट लावली. तसेच, कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटली. आपला कचरा घरामागील बाजूस एकत्र करून जाळला जाऊ शकतो; पण काही उपयोग झाला नाही. यंदाही तसाच उपक्रम राबवण्याचा विचार आहे; मात्र ७५ व्या वर्षी प्रकृती साथ देत नाही आणि मजूरही मिळत नाही. ही व्यथा आहे. त्यासाठी ग्रामस्थांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. विशेष या कार्यक्रमांमध्ये महिलांचा मोठा सहभाग मिळू शकतो. रायगडभूषण प्राप्त, कीर्तनकार, शाहीर हा विषय घेऊन प्रबोधन करू शकतात. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानासारखे एखादे स्पर्धात्मक अभियान राबवणे गरजेचे आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील याबाबतीत फार दक्ष आहेत. आपण या विषयाला वाचा फोडलीत, त्याबद्दल आपण कौतुकास पात्र आहात. धन्यवाद.

आपला
विजय सावंत
माजी सदस्य, रायगड जिल्हा परिषद
विन्हेरे, महाड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35528 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top