मंगेश सावंत शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगेश सावंत शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित
मंगेश सावंत शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित

मंगेश सावंत शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

कर्जत, ता. १० (बातमीदार) : महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मंगेश सावंत यांची निवड झाली आहे. त्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्‍या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कर्जतमधील जामरुंग सोलनपाडा या गावातील मंगेश सावंत कुटुंबाकडे स्वतःची सव्वा दोन एकर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये सावंत कुटुंब वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेतात. शेतीस पूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय व कुक्‍कुट पालनाकडे त्‍यांचा प्रामुख्याने सहभाग कायम आहे. तसेच प्रादेशिक भात संशोधन केंद्र कर्जत व कृषी विभाग यांच्‍याद्वारे घेतली जाणारी प्रशिक्षणे, चर्चासत्रे, तसेच शिवार फेरी यामध्ये नियमित सहभागी होऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांनी आत्तापर्यंत राज्यातील विविध भागांचा आणि आंतरराज्य अभ्यास दौऱ्यामध्ये सहभाग घेतला आहे. गुजरात राज्यामध्ये अभ्यास दौरा पूर्ण करून नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले आहे. त्यामुळेच खरीप २०१७ मधील भातपीक स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर हेक्‍टरी १९३ क्‍विंटल उत्पादन मिळवून त्‍यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर, जिल्हास्तरावरील भातपीक स्पर्धेमध्ये हेक्टरी १३२ क्‍विंटल उत्पादन मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. आपल्या शेतीत हंगामानुसार पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने राहिला आहे.
--------------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35548 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top