आपत्ती निवारणासाठी आता होमगार्डची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती निवारणासाठी आता होमगार्डची मदत
आपत्ती निवारणासाठी आता होमगार्डची मदत

आपत्ती निवारणासाठी आता होमगार्डची मदत

sakal_logo
By

अलिबाग, ता. ९ (वार्ताहर) ः पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या रायगड जिल्ह्यातील होमगार्डची आता आपत्ती निवारणासाठी मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी त्यांना पाच दिवसांचे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
रायगड जिल्ह्यात ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळ आले. या वादळात अनेक झाडे कोलमडून पडली. काहींचा मृत्यू झाला, तर अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. त्यानंतर १७ मे २०२१ रोजी जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ आले. या वादळातदेखील जिल्ह्याचे नुकसान झाले. महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळली होती. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. तसेच पोलादपूर व कर्जत, अलिबाग तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये वित्तहानीबरोबरच जीवितहानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली. अतिवृष्टीमुळे पूर व दरडीच्या संकटाशी सामना करताना, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलिस, महसूल, स्थानिक प्रशासन आदींनी शर्थीचे प्रयत्न केले. जिल्ह्यात तीन वर्षांपासून आपत्तीचे संकट निर्माण होत असल्याने प्रशासनाने होमगार्डची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये तीनशेपेक्षा अधिक होमगार्ड आहेत. जिल्ह्यातील मोर्चे, आंदोलने, वेगवेगळे सण, उत्सवांमध्ये पोलिसांसोबत राहून होमगार्ड कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करतात. या होमगार्डची मदत आता आपत्ती निवारणासाठी घेतली जाणार आहे. ९ ते १३ मे असे पाच दिवसांचे प्रशिक्षण पोलिस मुख्यालयात ठेवण्यात होणार असून राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत ते दिले जात आहे. त्यामध्ये प्रात्यक्षिकांवर भर दिला जात आहे. महाड येथील तळीयेत प्रशिक्षणार्थींना नेऊन त्या ठिकाणीही प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात दोनशे होमगार्ड सहभागी झाले आहेत.

जिल्ह्याला अडीच-तीन वर्षांपासून विविध आपत्तीला सामोरे जावे लागले. त्यात दरड कोसळणे, पूर आदींचा समावेश असून या आपत्तीशी सामना करण्यासाठी यापुढे होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे होमगार्ड कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेशक.

आपत्ती व्यवस्थापनासाठी लक्ष केंद्रित केले आहे. होमगार्ड कर्मचाऱ्यांना आपत्तीशी सामना करता यावा यासाठी बहुद्देशीय सभागृह उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मंजूर केला जाणार आहे. होमगार्डसाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तसेच रेस्क्यू टीमसाठीही प्रशिक्षण होणे आवश्‍यक आहे. अलिबागमध्ये ज्या पद्धतीने नियंत्रण कक्ष आहे, तसाच महाडमध्ये उभारण्याचा प्रयत्न आहे.
- अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड.

रायगड जिल्ह्यामध्ये दरड कोसळणे, पूर येणे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. आपत्तीच्या काळात होमगार्डची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी जाऊनही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- प्रकाश सोनटक्के, उपनिरीक्षक,
राज्य आपत्ती प्रतिसाद दल.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35552 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top