म्हसळा अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसळा अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
म्हसळा अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा

म्हसळा अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा

sakal_logo
By

म्हसळा अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
अलिबाग, ता. ९ : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस चालवल्याने घोणसे घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळल्‍याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यात बस नादुरुस्त, रस्त्याची खराब स्थिती, ब्रेक निकामी होणे अशी कोणतीही स्थिती तपास करणाऱ्या म्हसळा पोलिसांना आढळून न आल्याने वाहनचालक देवेंद्र भाईप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबाब देताना वाहनचालकाने ब्रेक निकामी झाल्याचा दावा केला होता, तो तपासात फेल ठरला. रविवारी सकाळी ८ वाजता झालेल्या या अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला; तर ३४ जण जखमी झाले आहेत. या जखमींवर अलिबाग आणि महाड येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्राजक्ता ट्रॅव्हल्सच्या बसने हे प्रवासी नालासोपारा येथून बोर्ली येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. बस घोणसे घाटातून प्रवास करीत असताना बसचालक देवेंद्र भाईप याला वळणदार रस्त्याचा अंदाज न आल्याने बस खोल दरीत कोसळली. या अपघाताला जबाबदार असणारा देवेंद्र भाईप याच्यावर सदोष मनुष्यवध, सार्वजनिक रस्त्यावर अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती म्हसळा पोलिस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी दिली आहे. या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क साधून सूचनाफलक, बॅरिकेट्स, संरक्षण कठडे बांधण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35565 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top