जलतरण तलावात कामगार बुडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलतरण तलावात कामगार बुडाला
जलतरण तलावात कामगार बुडाला

जलतरण तलावात कामगार बुडाला

sakal_logo
By

अलिबाग, ता. १० (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील राजमळा येथील आमदाराच्या बंगल्यासमोरील जलतरण तलावात बुडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहाय्यक निरीक्षक दत्तात्रेय जाधव तपास करीत आहेत.
यश प्रकाश घारू (२१, रा. नवेनगर, कुरूळ) असे मृत कामगाराचे नाव आहे. जलतरण तलावाची साफ सफाई करण्यासाठी तो पाण्यात उतरला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. बाजूला असलेल्या दुसऱ्या कामगाराच्या ही बाब लक्षात आल्यावर त्याने अन्य व्यक्तींच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढले व अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केले.
?

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35567 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top