भातच्या हमीभावाचे १०५ कोटी जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भातच्या हमीभावाचे १०५ कोटी जमा
भातच्या हमीभावाचे १०५ कोटी जमा

भातच्या हमीभावाचे १०५ कोटी जमा

sakal_logo
By

अलिबाग, ता. १० (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात आधारभूत किमतीत धान खरेदी योजनेंतर्गत यंदा पाच लाख ४६ हजार १८०.९३ क्‍विंटल भात खरेदी झाले. २६ हजार २२३ शेतकऱ्यांनी केंद्रावर भात खरेदी केले असून त्‍यांच्या खात्यात १०५ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. आजपर्यंत ९९ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्‍कम जमा झाल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने दिली आहे.
भात कापणीची कामे संपल्यानंतर भात खरेदी केंद्र कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या भाताला हमी भाव मिळावा, भात केंद्र वेळेवर सुरू करण्यात यावे यासाठी खरीप हंगामातील भात खरेदी केंद्र एक ऑक्टोबरपासून सुरू झाले. एक क्‍विंटल भात खरेदीवर एक हजार ९४० प्रमाणे रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील २७ भात केंद्रामध्ये भात खरेदी करण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या खात्यात भात खरेदीचे पैसे तत्काळ मिळावे, यासाठी ऑनलाईन पद्धतीने भात खरेदीची नोंदणी केंद्रावर करण्यात आली. त्यामध्ये लाभार्थ्याचा सातबारा, आधार कार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या भात खरेदीची रक्कम देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. पब्‍लिक, फायनान्स मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे शेतकऱ्यांना भाताचे पैसे मिळू लागले. जिल्ह्यातील २६ हजार २२३ शेतकऱ्यांना त्यांच्या भाताची रक्कम ऑनलाईनद्वारे जमा झाली आहे. परंतु २६० शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणे अद्याप बाकी आहे.
जुन्या बंद पडलेल्या बॅंक, पास बुकची झेरॉक्स, चुकीचे बॅंक खातेक्रमांक, अपूर्ण बॅंक खाते नंबर अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात भात खरेदी रक्कम जमा झालेली नाही. यासाठी पडताळणीची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना त्यांची रक्कम आठ दिवसांत मिळेल, असा विश्वास जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील ९९ टक्के शेतकऱ्यांना भात खरेदी रक्कम मिळाली आहे. उर्वरित एक टक्के शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. एकत्र खाते क्रमांक, अपूर्ण बॅंक खाते नंबर अशा अनेक कारणांमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. परंतु आठ दिवसांत पडताळणी करून रक्कम जमा केली जाईल.
- केशव ताठे, अधिकारी, जिल्‍हा मार्केटिंग फेडरेशन

रब्बी हंगामातील भात खरेदी ३० जूनपर्यंत
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील काही भाग, दक्षिण रायगडमधील काही भागात रब्बी हंगामात भाताची लागवड केली जाते. येथील काही ठिकाणी कापणीदेखील पूर्ण झाली आहे. या शेतकऱ्यांसाठी १ मे ते ३० जून या कालावधीसाठी भात खरेदीची मुदत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रावर भात खरेदी तत्काळ करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35568 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top