जिल्‍ह्यात नगरपरिषद निवडणुकांचे पडघम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍ह्यात नगरपरिषद निवडणुकांचे पडघम
जिल्‍ह्यात नगरपरिषद निवडणुकांचे पडघम

जिल्‍ह्यात नगरपरिषद निवडणुकांचे पडघम

sakal_logo
By

अलिबाग, ता. १० (बातमीदार) ः एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील नगर परिषद सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम १० ते १४ मे या कालावधीत होणार आहे.
प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी तसेच हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. प्रत्येक नगरपरिषद कार्यालयात हरकती व सूचना स्‍वीकारण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील नगरपरिषदांचा कार्यकाळ नुकताच संपला होता. गेल्या काही महिन्यांपासून नगरपरिषदांवर प्रशासक बसविण्यात आले होते. परंतु निवडणूक आयोगाने नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने लवकरच नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35572 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top