अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीच्या विकासाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीच्या विकासाला गती
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीच्या विकासाला गती

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीच्या विकासाला गती

sakal_logo
By

पाली, ता. १० (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील विकास कामांसाठी तब्बल १० कोटी ५५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. नव्याने प्रस्थापित झालेल्या पाली नगरपंचायतीच्या विकासासाठी यातील निम्म्याहून अधिक निधी मिळाला आहे. सोमवारपासून पालीतील रस्ते निर्मितीला सुरुवातही झाली आहे.
खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे व नगराध्यक्षा गीता पालरेच्या यांच्या प्रयत्नाने महाविकास आघाडी शासनातर्फे हा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा नियोजन नगरोत्थान व प्रादेशिक पर्यटन मार्फत २ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पाली शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व भुयारी गटारे निर्मिती होणार आहे. याशिवाय तलाव सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
नगरपंचायत नागरी सुविधा साहाय्यक योजनेंतर्गत ३ कोटी २० लाख निधीतून मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. तर अल्पसंख्याक विकास निधीतून पालीतील कब्रस्तानची देखभाल-दुरुस्‍ती करण्यात येणार आहे.

कोट्यवधींचा निधी मंजूर
सुधागड तालुक्‍यातील नागशेत, कोशिंबळे, घोटावडे आणि शिळोशी गावांना जोडणाऱ्या रस्‍त्‍यांच्या निर्मितीसाठी अडीच कोटींचा निधी उपलब्‍ध झाला आहे. याशिवाय ९७ लाखाच्या मंजूर निधीतून तालुक्यातील विविध रस्ते, समाज मंदिर व साकव बांधण्यात येणार आहेत. तालुक्यातील पर्यटन विकास, रस्ते, शाळा दुरुस्ती व स्मशानभूमी शेडसाठी ६८ लाखांचा निधी उपलब्‍ध झाला आहे.


सुधागड तालुक्‍यासाठी आलेल्‍या विकास निधीपैकी बहुतांश कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पालीतील रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. लवकरच शुद्ध पाणी योजना मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालीच्या विकासाला गती देण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे.
- गीता पालरेचा, नगराध्यक्षा, पाली

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35580 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top