रस्ता दुरुस्तीसाठी संतोष बावधाने यांचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता दुरुस्तीसाठी संतोष बावधाने यांचे उपोषण
रस्ता दुरुस्तीसाठी संतोष बावधाने यांचे उपोषण

रस्ता दुरुस्तीसाठी संतोष बावधाने यांचे उपोषण

sakal_logo
By

पाली, ता. १२ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी, येथून जाणाऱ्या ग्रामस्थांसह पर्यटकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी, यासाठी गौळमाळ येथील माजी उपसरपंच संतोष बावधाने हे सोमवारपासून (ता. १६) पाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना दिले आहे.
पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव हा रस्ता अनेक गाव, आदिवासी वाड्या व धनगर वाड्यांना जोडतो. तसेच पाच्छापूर येथे असलेल्या सुधागड किल्ल्यावर नियमित पर्यटक व इतिहासप्रेमी येत असतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या सर्वांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून काही ठिकाणी तर वाहून गेला आहे. रस्त्यावरील डांबर जाऊन खडी बाहेर आली आहे. अशा खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि रस्त्याचे दर्जेदार काम व्हावे, यासाठी बावधाने बेमुदत उपोषण करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35586 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top