घोटाळेबाज रेशन दुकानाची मान्यता रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोटाळेबाज रेशन दुकानाची मान्यता रद्द  करा
घोटाळेबाज रेशन दुकानाची मान्यता रद्द करा

घोटाळेबाज रेशन दुकानाची मान्यता रद्द करा

sakal_logo
By

कर्जत, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील कडाव गावातील रेशन दुकानदार ग्राहकांच्या धान्य वाटपात घोटाळा करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या दुकानदाराची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी, यासाठी सुमारे १५० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते जनार्दन दुघड यांनी ग्रामस्थांच्या वतीने नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि पुरवठा विभागाच्या नीता गोरेगावकर यांना सादर केले आहे.
रेशनिंगधारकांना आलेले त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर दिले जात नाही. धान्य असूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अनेक जणांना धान्य दिले जात नाही, मिळत नाही. ज्यांना रेशनिंगचे धान्य मिळते, त्यांना धान्याची पावती दिली जात नाही. वजनात धान्य कमी देणे, सरकारकडून चांगल्या प्रतीचे धान्य येत असूनही कमी दर्जाचे आणि किडलेले धान्य दिले जाते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गावातील नागरिकांनी यापूर्वी या दुकानदाराबाबत अनेक वेळा तक्रार करूनही त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, अशी खंत कडाव, माणकिवली व ठोंबरवाडी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
--------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35587 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top