आंबा बागायतदार धास्‍तावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबा बागायतदार धास्‍तावले
आंबा बागायतदार धास्‍तावले

आंबा बागायतदार धास्‍तावले

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यातील बागायतदारांची सध्या आंबा काढणीची लगबग सुरू आहे. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्‍याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पाऊस पडल्यास आंबा पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये १४ हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र असून १२ हजार ५४० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. जिल्ह्यात ५६ हजार आंबा उत्पादक शेतकरी आहेत. भात शेतीबरोबरच आंब्याची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जिल्ह्यात एक हेक्टर क्षेत्रामध्ये अडीच टन इतकी उत्पादकता आंब्यापासून मिळते. गेल्या आठ दिवसांपासून आंबा काढणीला वेग आला आहे. हा आंबा पेट्यांमध्ये भरून नवी मुंबई व अन्य बाजारपेठांत विक्रीसाठी पाठविण्याची लगबग सुरू झाली आहे; परंतु राज्यात काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या
दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. पूर्व किनारपट्टीवर होणाऱ्या आसनी चक्रीवादळामुळे पावसाळी वातावरण दिसून येत आहे. ढगाळ वातावरण दोन ते दिवस राहण्याची शक्यता असून जिल्ह्यातील काही भागांमध्ये रिमझीम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्‍त झाले आहेत. आंबा काढणी सुरू असताना पाऊस आल्‍यास पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. त्याचा फारसा परिणाम होणार नाही; परंतु पाऊस पडल्यास आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने काढणी करून आंबा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- दत्तात्रेय काळभोर, उपसंचालक, कृषी.

जिल्ह्यात गेल्‍या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागांमध्ये तुरळक स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा व अन्य फळ पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- सागर पाठक, अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन.

डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे यंदा आंबा उशिरा तयार झाला आहे. आतापर्यंत २० टक्के आंबा विक्रीसाठी पाठवला आहे. उर्वरित ८० टक्के आंबा बाजारात जाणे शिल्लक आहे. आंबा काढणीचे काम सुरू आहे. बदलत्या वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे आंब्यांचे प्रचंड नुकसान होण्याची असून उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतो.
- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35589 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top