लाळखुरकत लसीकरण शंभर टक्के पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाळखुरकत लसीकरण शंभर टक्के पूर्ण
लाळखुरकत लसीकरण शंभर टक्के पूर्ण

लाळखुरकत लसीकरण शंभर टक्के पूर्ण

sakal_logo
By

अलिबाग, ता. ११ (बातमीदार) : उन्हामुळे पशुधनावर लाळखुरकत हा विषाणूजन्य रोग येण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गाय व म्हैस वर्गातील पशुधनांचे लाळखुरकत लसीकरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू केले होते. हे लसीकरण आता १०० टक्के पूर्ण झाले असून आतापर्यंत २ लाख १५ हजार ४०० लशीचे वाटप करण्यात आले आहे.
वाढत्या उष्णतेमुळे तहान लागत असल्याने पाळीव जनावरे मिळेल तेथे पाणी पितात. त्यामुळे ताप येणे, अपचन होणे, प्रकृती खालावणे असा त्रास होतो. लाळखुरकत या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास तोंडातून लाळ गळणे, दुधाचे प्रमाण कमी होणे, जनावरे मृत पावण्याचा धोका निर्माण होतो. उन्हाळ्यात या जनावरांना लाळखुरकतचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी एप्रिल ते ऑक्टोबर या दुसऱ्या टप्प्यातील दोन लाख १५ हजार ४०० लशीच्या मात्रा रायगड जिल्ह्यासाठी उपलब्ध झाल्या. पशूंच्या संवर्धनाबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने लाळखुरकत लसीकरण पशुसंवर्धन विभागामार्फत ९ मार्चपासून ही मात्रा देण्यास सुरुवात झाली. तालुकास्तरावर हे लसीकरण युद्धपातळीवर करण्यात आले. जिल्ह्यात गाय व म्हैस या वर्गातील दोन लाख ३९ हजार १३१ इतके पशुधन असून या सर्वांना लस देण्यात आली आहे. यामध्ये पशूंचे वय आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना लशींची मात्र देण्यात आली. सध्या लसीकरण १०० टक्के पूर्ण झाल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

-------------------
पशुधन व लस
गाय व म्हैस - दोन लाख ३९ हजार १३१
उपलब्ध लस मात्रा - २,१५, ४००
-------
लसमात्रा वाटपावर दृष्टिक्षेप
अलिबाग - १२,०००
पनवेल - ११,८००
पेण - १३,६००
कर्जत - ३३,८००
उरण - ४,०००
रोहा - १७,३००
पाली - १५,१००
खालापूर - १२,५००
माणगाव - २०,०००
महाड - २९,०००
मुरूड - ६,९००
म्हसळा - १०,०००
तळा - ९,२००
श्रीवर्धन - ७,२००
पोलादपूर - १३,०००
---------------

थंडींच्या व उन्हाळ्याच्या हंगामात लाळखुरकत हा विषाणूजन्य आजार गाय व म्हैस वर्गातील जनावरांना होतो. या रोगामुळे अनेक वेळा पशुधनावर परिणाम होतो. त्यामुळे पशुधनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचे काम वेगात करण्यात आले. यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित लसीकरण लवकरच होईल. यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत.
- डॉ. राजेश लाळगे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन
जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय अलिबाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35592 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top