पोलिस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम
पोलिस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम

पोलिस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम

sakal_logo
By

पोलिस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम
अलिबाग : रायगड जिल्हा पोलिस व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत कृषी विभाग, डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना या विषयावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्‍ज्वला बाणखेले आणि माणगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील उपस्थित होते. पोलिस पाटलांचा क्षमता बांधणी कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामध्ये शासकीय योजना, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विविध विषयांवर प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने आणि पोलिस निरीक्षक केरूभाऊ कोल्हे यांच्या सहकार्याने व स्वदेस फाउंडेशनच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35597 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top