पेझारीमधील महिलेची आर्थिक फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेझारीमधील महिलेची आर्थिक फसवणूक
पेझारीमधील महिलेची आर्थिक फसवणूक

पेझारीमधील महिलेची आर्थिक फसवणूक

sakal_logo
By

अलिबाग (बातमीदार) : तालुक्यातील पेझारी येथील एका महिलेची ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. त्यांच्या घरातील धनादेश अज्ञाताने लंपास करून त्यावर खोट्या सहीने सानपाडा येथील अॅक्सिस बॅंकेत वटवण्यात आला. ही घटना २१ एप्रिल ते ९ मे या कालावधीत घडली. याप्रकरणी पोयनाड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमना पाटील असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पेझारी येथील घर उघडे होते. याचा फायदा घेत चोरट्याने घरात असलेला धनादेश लंपास केला. त्या धनादेशावर फिर्यादीची खोटी सही केली. त्यानंतर सुप्रभात इन्फ्राझोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा बनावट शिक्का मारून नवी मुंबईतील सानपाडामधील अॅक्सिस बॅंकेमार्फत ११ लाख रुपयांचा धनादेश वटवण्यात आला. ही बाब पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोयनाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अतिग्रे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35599 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top