कुरूळमध्ये हाणामारीत एक जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरूळमध्ये हाणामारीत एक जण जखमी
कुरूळमध्ये हाणामारीत एक जण जखमी

कुरूळमध्ये हाणामारीत एक जण जखमी

sakal_logo
By

अलिबाग (बातमीदार) : कुरूळमध्ये सोमवारी (ता. ९) दुपारी झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कुरूळ येथील आदिवासीवाडीजवळ घडली. तक्रारदार हा कुरूळ येथील आगरआळीमधील रहिवासी आहे. सोमवारी त्याच गावातील दत्त टेकडीजवळ राहणारे शिरी भगत यांच्या मुलाच्या हळदी समारंभासाठी आले होते. दुपारी अडीच वाजता हळदी समारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना दोघांनी त्यांना अडवले आणि पुन्हा हळदीच्या कार्यक्रमात जाण्याची जबरदस्ती केली. त्या वेळी त्यांनी नकार दिला. याचा राग धरून एकाने शिवीगाळी केली, तर दुसऱ्याने लाकडी काठीने अंगावर उपट घातली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिस हवालदार एस. एस. शेलार अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35600 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top