
ठाणाळे येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पाली, ता. ११ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील ठाणाळे गावातील एका ३५ वर्षीय तरुणाने बुधवारी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथील संदीप विठ्ठल फाटे (३५) हा तरुण मंगळवारी मी शेतात जाऊन फेरी मारून येतो, असे घरी सांगून गेला, तो रात्री परत आला नाही. म्हणून त्याचा गावात व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो तेथेही आढळून आला नाही. बुधवारी सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास गावातील व्यक्तीस एका शेताजवळील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत संदीपचा मृतदेह आढळून आला. या घटनेची पाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षार्थी पोलिस उपनिरीक्षक एल. एन. सरगर हे करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35605 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..