
जप्त केलेल्या अंमली पदार्थांची विल्हेवाट
अलिबाग, ता. १२ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यामध्ये गांजासह अन्य अमली पदार्थाची वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. कारवाईत १३१ किलो ३३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अपर अधीक्षक अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत हा साठा नष्ट करण्यात आला.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या रायगड जिल्ह्यात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. परंतु जिल्ह्यात गांजा व अन्य अंमली पदार्थाच्या आहारी तरुणाई जाऊ नये, यासाठी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाईचे सत्र सुरू केले होते. जिल्ह्यातील पेण, खालापूर, पाली, नागोठणे, खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून सात गुन्हे दाखल केले होते. कारवाईत ४१ लाख ५२ हजार ४३४ रुपये किमतीचा १३१ किलो ३३० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील तळोजा येथील एमआयडीसीत मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या ठिकाणी योग्य प्रक्रिया करून गांजा नष्ट करण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35609 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..