
नेरळ आधार संस्थेच्या अध्यक्षपदी सुनील राजे
कर्जत, ता. १२ (बातमीदार) : दिव्यांगाच्या प्रगतीसाठी झटणारी नेरळ आधार अंध-अपंग संस्थेच्या अध्यक्षपदी सुनील कमलाकर राजे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन अध्यक्ष अनिता रोकडे यांचा मृत्यू झाल्याने संस्थेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यामुळे संस्थेचे खजिनदार सुनील राजे यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुकता दर्शवल्याने त्यांची सर्वानुमते ठराव घेऊन नियुक्ती केली.
नेरळ ग्रामपंचायत परिसर मर्यादित १०० हून अधिक दिव्यांगाची संख्या आहे. या दिव्यांगांच्या प्रगतीसाठी नेरळ अंध अपंग संस्था ही कार्यरत आहे. याच संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सुनील राजे यांनी घेतली आहे. विकास कुलकर्णी यांच्यावर सचिव पदाची, तर सागर दिघे खजिनदार म्हणून नियुक्ती झाले आहेत. त्याचबरोबर इब्राहीम शेख, प्रकाश चंचे, फिरोज खान, कैलास सावरकर, समीर पालशातकर, शोभा पालशातकर, राम शंकर पवार, पार्थ कोठारी, कर्वे, रवी वजारकर हे सदस्य म्हणून संस्थेने नेमले आहेत. दिव्यांगांना सरकारच्या योजनांचा लाभ कसा मिळेल, यासाठी संघटना काम करणार असल्याची यावेळी माहिती देण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35611 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..