
अखेर टाकाची वाडीची पाणी समस्या दूर
कर्जत, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील दामत भडवळ येथील टाकाची वाडी येथे नळपाणी योजना नसल्याने तेथील एका बोअरवेलमधून ग्रामस्थांची तहान भागवली जात असे. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही बोअरवेल नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. प्रसाद थोरवे यांनी पुढाकार घेत बोअरवेल दुरुस्त केल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची तहान भागली असून उन्हात होणारी वणवण थांबली आहे.
कर्जत तालुक्यातील दामत भडवळ येथील टाकाची वाडी गावात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन विहिरी आहेत. यातील दोन विहिरींनी अगोदरच तळ गाठले होते, तर तिसर्या विहिरीची पडझड झाल्याने पाण्याअभावी ग्रामस्थांना उन्हात वणवण फिरावे लागत होते. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी वामन वाघ आणि ग्रामपंचायत सदस्य किशोर घारे यांनी आदिवासी ग्रामस्थांसह आमदार महेंद्र थोरवे, तसेच युवा सैनिक प्रसाद थोरवे यांची भेट घेतली. पाणी समस्या कायम आपल्या वाट्याला येत असल्याची खंत भेटीदरम्यान व्यक्त केली. पाणी समस्येची त्वरित दखल घेत थोरवे यांनी बोअरवेल दुरुस्त करून दिली. तसेच पुढील काळात टाकाची वाडी येथे नवीन स्वतंत्र नळपाणी योजना राबवण्याचे आश्वासन दिले. या वेळी शिवसैनिक उपतालुकाप्रमुख अंकुश दाभणे, अंकुश शेळके यांसह सुभाष मिनमीने, वामन वाघ, किशोर घारे, दिनेश माळी, गोपीनाथ राणे, रोहन पाटील, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------
कर्जत : टाकाची वाडी येथील बोअरवेलची दुरुस्ती करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35612 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..