कुंचल्यातून कॅनव्हॉसवर अवतरले कोकण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंचल्यातून कॅनव्हॉसवर अवतरले कोकण
कुंचल्यातून कॅनव्हॉसवर अवतरले कोकण

कुंचल्यातून कॅनव्हॉसवर अवतरले कोकण

sakal_logo
By

कर्जत, ता. १२ (बातमीदार) : मूळ दापोली तालुक्यातील शिक्षणासाठी कर्जतच्या दहिवलीमध्ये स्थायिक झालेल्या उदयोन्मुख चित्रकार कुणाल विजय साळवी याच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे. यात कोकणासह मुंबईतील विविध ठिकाणांचे दर्शन घडवले आहे. हे प्रदर्शन १६ मेपर्यंत खुले असणार आहे.
कुणालचे लहानपण कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात गेले. शालेय शिक्षणासाठी कोकणातून मुंबईत आल्यावर शाळेत चित्रकलेच्या तासाला तो विविध चित्रे काढू लागला. मनाच्या कॅनव्हासवर लहानपणी उमटलेले विविध रंग होतेच. ते आपोआप कागदावर उतरत गेले. काही चित्रांमुळे शिक्षकांना त्याच्यातील वेगळेपण जाणवले. त्यानंतर त्याला प्रोत्साहन आणि वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. त्याने मनाशी निर्णय दृढ केला तो चित्रकार बनण्याचा. आर्ट कॉलेजमध्ये शिकत असताना मुंबईतल्या विविध रस्त्यांनी, गल्ली-बोळांनी फिरत असताना अनेक जागांनी तो भारावून जात असे. ती प्रत्येक ठिकाणे त्याला नवीन होती. मनाला खुणावत होती. तो त्यांच्याकडे आकर्षित होत गेला. कोकणातल्या देखाव्यानंतर त्याच्या मनावर राज्य केले, ते मुंबईतील वेगवेगळ्या जागांनी. त्याच्या याच चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू असून ते १६ मेपर्यंत असणार आहे.


परदेशी रसिकांनाही भुरळ
कोकणातील समृद्ध जीवन दाखवताना सोबतच मुंबईतील चित्रे तो साकारत होता. या प्रक्रियेत त्याचा नेहमी हाच प्रयत्न असे की चित्र हे मनाला भावणारे असावे. जशी त्याची चित्रे त्याच्याशी संवाद साधतात. तशी त्यांचा तुमच्याशीही संवाद साधला गेला पाहिजे, असा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्याच्या चित्रांची भुरळ परदेशी चित्र रसिकांनाही आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35620 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top