सरसगडावरील प्लास्टिक कचरा हद्दपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरसगडावरील प्लास्टिक कचरा हद्दपार
सरसगडावरील प्लास्टिक कचरा हद्दपार

सरसगडावरील प्लास्टिक कचरा हद्दपार

sakal_logo
By

पाली, ता. १४ (वार्ताहर) : पालीतील सरसगड किल्ल्यावर ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बॉटल आणि कचरा हटवण्यात आला आहे. येथील देऊळवाड्यातील प्रदीप व स्वाती गोळे या दाम्पत्याने सरसगड स्वच्छता मोहीम राबवून किल्ल्याचा बराचसा भाग प्लास्टिकमुक्त केला आहे.
प्रदीप व स्वाती गोळे दाम्पत्य, तसेच येथील अभिजित वरंडे हा तरुण गडाच्या पायथ्याशी लावलेली झाडे जगवण्यासाठी नियमित झाडांना पाणी घालतात. तर दुसरीकडे गडावर नेहमी येणाऱ्या पर्यटक व दुर्गप्रेमीतील काही जण पाण्याच्या बॉटल, वेफर्स व इतर खाद्यपदार्थांचे वेस्टन तेथेच टाकून जात आहेत. अशा प्रकारामुळे प्लास्टिक कचरा सर्वत्र पसरल्याने परिसर अस्वच्छ होऊन गडाची शोभा जात होती. त्यामुळे गोळे दाम्पत्यानी स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी प्लास्टिकच्या बाटल्या आणि खाऊची वेस्टनासह इतर कचरा जमा करून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

-------------------------------
सरसगडावर येणाऱ्या गडप्रेमींना विनंती आहे, सोबत आणलेल्या खाऊच्या पिशव्या आणि प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या गडावर टाकू नये. येथे लावलेल्या डस्टबिनमध्येच हा कचरा टाकावा.
- प्रदीप (दादू) गोळे, दुर्गप्रेमी

--------------------------------
सरसगड किल्ला
पाली हे गाव सरसगडाच्या पायथ्याशी वसले आहे. अग्निजन्य खडकापासून बनलेल्या या किल्‍ल्याची उंची समुद्र सपाटीपासून ४९० मीटर आहे. शिवाजी महाराजांनी २ हजार होन खर्चून दुरुस्त करून घेतला होता. त्‍याच्यावर शंकराचे मंदिर, त्या बाजूला तळे, शहापीर दर्गा, कोठार, पाण्याचे टाके (हौद), तटबंदी पाहावयास मिळते. किल्‍ल्याच्या दक्षिण बाजूकडील १११ पायऱ्या सलग एकाच दगडात घडवलेल्या असून उंच व प्रशस्त आहेत. पावसाळ्यात किल्ला जणू ढगांच्या कुशीत लपला आहे, असे वाटते. पालीतून किल्‍ल्यावर पोहचायला साधारण एक तास लागतो.


पाली : सरसगडावर स्वच्छता करतांना स्वाती गोळे.
पाली : गोळे दाम्पत्यांनी सरसगडावरून गोळा केलेला प्लास्टिक कचरा.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35622 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top