पहिल्‍याच दिवशी नवी कोरी पुस्तके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्‍याच दिवशी नवी कोरी पुस्तके
पहिल्‍याच दिवशी नवी कोरी पुस्तके

पहिल्‍याच दिवशी नवी कोरी पुस्तके

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४: गतवर्षी कोरोनामुळे पुस्तकांची छपाई उशिराने झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उशिराने मिळाली होती; मात्र, यंदा शिक्षण विभागाने केलेल्या योग्य नियोजनामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १३ जूनपासून सुरू होत असून पहिल्याच दिवशी विद्यार्‍थ्‍यांना पुस्तके मिळावी यासाठी पुस्तक संच ३१ मेपर्यंत मुख्याध्यापकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत.
समग्र शिक्षा अभियानातून जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या एकूण नऊ लाख ७७ हजार १७३ विद्यार्थ्यांना पुस्तक संच दिले जाणार आहेत. बालभारतीकडून हे संच जिल्ह्यात पाठवण्यास सुरुवात झाली आहे. पुस्तक वाटपामध्ये होणारा गोंधळ बघता बालभारतीने यंदा तालुका पातळीपर्यंत पुस्तक पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तालुका पातळीवरून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुस्‍तके मुलांपर्यंत पोहोचतील. शाळा सुरू होण्याआधीच दोन महिने शिक्षण विभागाकडून जिल्हा पातळीवर विद्यार्थ्यांची संख्या आणि पुस्तकाची मागणी याची यादी मागविली जाते.

पुनर्वापरासाठी योग्य पुस्तकांचेही वाटप
नियमित पाठ्यपुस्तकांची नोंदणी करताना बालभारतीकडून गतवर्षी शिल्लक राहिलेली किंवा पुनर्वापरासाठी योग्य असलेली पुस्तकांची संख्या वगळून मागणी करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी नोंदवली. ही पुस्तके येण्यास सुरुवात झाली आहे.

तालुकानिहाय पुस्तक संच
अलिबाग - ६३, १९९
पेण - ८३, ७१५
पनवेल - २, ११, ५९२
उरण - ४८, ७२७
कर्जत - १,१३,३९८
खालापूर - ८१,६५८
रोहा - ६४,३१२
सुधागड - ४७,८४७
माणगाव - ७२,५७५
पोलादपूर - १७,६१३
महाड - ६८,९५२
म्हसळा - २६,१०८
श्रीवर्धन - ३४,२११
मुरुड- २८,०५३
तळा - १५,१९५
एकूण -९,७७,१७३

मोठ्या खंडानंतर लहान मुलांचा उत्साह वाढविणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बालभारतीकडून काही तालुक्यांची पुस्तके आली आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पुस्तक संचांचे वाटप विद्यार्थी संख्येनुसार मुख्याध्यापकांकडे होईल आणि मुख्याध्यापक शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देतील.
- नमिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्‍हा परिषद

**

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35638 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top