उल्‍हास नदीला गाळ, जलपर्णीचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्‍हास नदीला गाळ, जलपर्णीचा विळखा
उल्‍हास नदीला गाळ, जलपर्णीचा विळखा

उल्‍हास नदीला गाळ, जलपर्णीचा विळखा

sakal_logo
By

कर्जत, ता. १७ (बातमीदार)ः पावसाळा तोंडावर आला असूनही उल्हास नदी पात्रातील गाळ काढणे, जलपर्णीच्या विळख्यातून सुटका करणे आदी कामांना सुरुवात झालेली नाही. त्‍यामुळे अतिवृष्टी झाल्यास नदी पात्रातून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होईल, गतवर्षीप्रमाणे जलप्रलय होऊन पूर परिस्थिती ओढवण्याची भीती कर्जतकरांना आहे.
शहरातील उल्हास नदी निर्मल जल अभियान संस्थेने नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी, नदीतील गाळ,जलपर्णी काढण्यासाठी तसेच या मोहिमेला पाठबळ मिळण्यासाठी यामध्ये कर्जतकरांना सामावून घेत प्रभागवार परिषदा घेतल्या. याला नागरिकांनीही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. या सर्वांनी मिळून नगरपरिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार करीत पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छतेची मागणी केली. मात्र नगर परिषदेकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

नगर परिषदेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेंतर्गत नदी स्वच्छता हा मुद्दाही समाविष्ट आहे. त्यामुळे नगरपरिषदेने मोठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. केवळ जनजागृतीपर सूचना फलक न लावता, नदीतील गाळ आणि जलपर्णी काढणे आवश्‍यक आहे, अन्यथा यंदाही पूरस्‍थिती निर्माण होऊ शकते.
समीर सोहोनी, उल्हास नदी निर्मल जल अभियान

शहरातील सांडपाणी नदीपात्रात
कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीलगतच मोठमोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीतील सर्व मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. तसेच काही जण अंधाराचा फायदा घेत कचरा फेकतात. काही ठिकाणी नदीपात्रात रिसॉर्ट मालकांनी बेकायदा बांधकाम केले आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला याच नदीला जोडल्‍याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते.

नदी संवर्धनाचा आराखडा तयार
पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, या करिता उल्हास नदीचे संर्वधन करणे गरजेचे असून कर्जत पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचा डीपीआर (आराखडा) तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्‍याची माहिती यापूर्वीचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली. तर नुकत्याच रुजू झालेल्या नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भगणे यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35696 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top