पालीत गौतम बुद्ध जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीत गौतम बुद्ध जयंती साजरी
पालीत गौतम बुद्ध जयंती साजरी

पालीत गौतम बुद्ध जयंती साजरी

sakal_logo
By

पाली, ता. १७ (वार्ताहर) : सुधागड तालुका बौद्धजन पंचायततर्फे गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव सोमवारी (ता.१६) पालीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जयंती महोत्सवासाठी पालीतील बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह सजवण्यात आले होते. तसेच पाली बस स्थानक आवारात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी भीम अनुयायांनी पालीमध्ये वाजतगाजत भव्य मिरवणूक काढली होती. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने भीम अनुयायांना सरबत वाटप करण्यात आले. तसेच रात्री कव्वालीचा कार्यक्रम झाला. जयंती महोत्सवात सुधागड तालुका बौद्धजन पंचायतचे पदाधिकारी, सभासद व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाली : जयंती महोत्सवानिमित्त पाली शहरात काढण्यात आलेली मिरवणूक.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35697 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top