जिल्ह्यात बीज प्रक्रिया अभियान सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात बीज प्रक्रिया अभियान सुरू
जिल्ह्यात बीज प्रक्रिया अभियान सुरू

जिल्ह्यात बीज प्रक्रिया अभियान सुरू

sakal_logo
By

अलिबाग, ता. १८ (बातमीदार) : जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाला पाहिजे. पिकांच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून रायगड जिल्ह्यातील कृषी विभागाने बीज प्रक्रिया अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करणाऱ्यांवर भर देण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील गावागावांत कृषी सहायकांमार्फत जनजागृती सुरू केली असून हे अभियान ३० मेपर्यंत असणार आहे.
अनेक वेळा भात पेरणी करूनही १०० टक्के बियाणांची उगवण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. रायगड जिल्ह्यामध्ये ९७ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी भातपिकांची लागवड करतात. पावसाळा सुरू होण्याआधी शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचे भात बियाणे खरेदी करतात. परंतु, अनेक वेळा पेरणी केल्यानंतर काही बियाणांची उगवण होत नाही. तसेच काही वेळा भाताची लोंबीत धान्य नसल्याचे दिसून आले आहे. ही समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पेरणी करण्याआधी बीज प्रक्रिया अभियान सुरू केले आहे. या अभियानातून गावोगावी जनजागृती सुरू केली आहे. बीज प्रक्रियेमुळे बियांची उगवण क्षमता वाढते. रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. परिणामी, पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते. ही माहिती प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भेटून देण्याचे काम कृषी सहायकांच्या मदतीने करण्यास सुरुवात केली आहे. गावागावातील शेतकऱ्यांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने येथील गावात हे अभियान सुरू करण्यात आले. कृषी सहायक अशोक मिसाळ यांच्यामार्फत शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व व त्यातून होणारे फायदे याची माहिती दिली.
-------------
शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भातपिकांपासून चांगले उत्पादन मिळावे. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे आणि पिकांवरील रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीज प्रक्रिया अभियान सुरू केले आहे. या अभियानातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गावागावांत बीज प्रक्रियेची माहिती दिली जात आहे. या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
- अशोक मिसाळ, कृषी सहायक, कृषी विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35707 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top