माजी उपसरपंच बावधाने यांचे उपोषण स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी उपसरपंच बावधाने यांचे उपोषण स्थगित
माजी उपसरपंच बावधाने यांचे उपोषण स्थगित

माजी उपसरपंच बावधाने यांचे उपोषण स्थगित

sakal_logo
By

पाली, ता. १८ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी गौळमाळ येथील माजी उपसरपंच संतोष बावधाने हे पाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार होते. मात्र, तहसीलदारांच्‍या लेखी आश्वासनानंतर बावधाने यांनी उपोषण स्थगित केले आहे. मंगळवारी (ता. १७) त्‍यांनी या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
नादुरुस्‍त रस्त्यासंदर्भात योग्य कारवाई करू, असे आश्वासित केल्यामुळे उपोषण २२ मेपर्यंत स्थगित केले आहे. मात्र, तहसीलदारांनी यासंदर्भात दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास २३ मेपासून पाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्‍याचा इशाराही त्‍यांनी निवेदनात दिला आहे. दरम्‍यान, बावधाने यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने तालुका समन्वय समिती अध्यक्ष, गटविकास अधिकारी व शाखा अभियंता यांच्यासोबत तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी बैठक घेऊन हा रस्ता दुरूस्त करण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून रस्त्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिल्‍याचे पत्रात नमूद केले आहे.

पाली : पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव रस्त्याची झालेली दुरवस्था.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35711 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top