पावसाळ्यातील रोगराईमुक्तीसाठी धडपड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यातील रोगराईमुक्तीसाठी धडपड
पावसाळ्यातील रोगराईमुक्तीसाठी धडपड

पावसाळ्यातील रोगराईमुक्तीसाठी धडपड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : पावसाळ्यात दूषित पाण्याने अनेक वेळा साथरोगांचा सामना रायगड जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. रोगप्रसार टाळण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे आणि रोगराईमुक्त पावसाळ्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ, विषमज्वर अशा जलजन्य साथरोगांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सखल भागात साचलेले पाणी आणि सांडपाण्यातून कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्याच्या कालावधीत दूषित पाण्याच्या सेवनाने साथजन्य परिस्थिती उद्‍भवणार नाही, या दृष्टीने गावपातळीवर पाणी गुणवत्तेच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे काही पूर्व प्रतिबंधक उपाय लक्षात घेणे गरजेचे असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. रोगराई टाळण्यासाठी पावसाळ्यात उघड्यावरचे खाऊ नये, ओला व सुका कचरा यांचे व्यवस्थापन करावे, घराभोवती पालापाचोळा, कचरा, पाण्याची डबकी साठवून देऊ नये, पाणवठे शुद्ध ठेवणे गरजेचे आहे, पिण्याचे पाणी शुद्ध निर्जंतुक करून प्यावे, पाणी गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी आणि शुद्धीकरणासाठी मेडीक्लोरीनचे द्रावण किंवा टीसीएल पावडरचा उपयोग करावा, पाणी उकळून व गाळून प्यावे, हातपंपाचे शुद्धीकरण करावे, अशा उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.
***
पावसाळ्यात साथीचे आजार उद्‍भवल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, पावसाळ्यात अशी काळजी घेतल्यास आपले कुटुंब आणि परिसरातील नागरिकांना आपण साथीच्या रोगांपासून मुक्त ठेवू शकतो, रोगप्रसार टाळण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे आणि रोगराईमुक्त पावसाळ्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
- डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35720 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top