
रा. स्व. संघाचे राजाभाऊ काळे यांचे निधन
कर्जत, ता. १९ (बातमीदार) : कर्जतचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय धोंडो उर्फ राजाभाऊ काळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. राजाभाऊ बालपणापासून संघाचे स्वयंसेवक होते. जनता सहकारी ग्राहक भांडार, कर्जत तालुका प्राथमिक पतपेढी, अभिनव ज्ञान मंदिर शिक्षण संस्था, कर्जत तालुका प्राथमिक पतपेढी, लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय, ओक प्रतिष्ठान, डॉ. हेडगेवार स्मारक समिती, अशा विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांवर त्यांनी काम केले. अचूक हिशेब, सचोटी व वेळेत काम करणे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. त्यांचे घर म्हणजे संघाच्या कार्यकर्त्यांचे घर. आपले घरदार सोडून पूर्ण वेळ संघाच्या कामासाठी बाहेर पडलेल्या प्रचारकांचे त्यांनी पालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. अयोध्या आंदोलन सक्रिय सहभाग, रा. स्व. संघाच्या विचारावर काम करणारे निस्प्रुह, प्रामाणिक, मार्गदर्शक हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
फोटो :