
विहिंपचे श्रीकृष्ण करमरकर यांचे निधन
कर्जत, ता. २३ (बातमीदार) : विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण करमरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. बीएससी एमएडपर्यंत शिक्षण घेतलेले करमरकर यांनी ३१ वर्षे अभिनव ज्ञान मंदिर शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली. निवृत्तीनंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर संघाने त्यांच्यावर विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ती त्यांनी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे सांभाळली. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेत काम करत असताना विद्यार्थ्यांची विमानातून सहल आयोजित करण्यात आली होती. रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे त्यांनी काही काळ अध्यक्षपदही सांभाळले होते. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली समयी व्यक्त केल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35757 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..