मिनिडोअर मॅजिक गाडीच्‍या अपघातात दोन ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिनिडोअर मॅजिक गाडीच्‍या अपघातात दोन ठार
मिनिडोअर मॅजिक गाडीच्‍या अपघातात दोन ठार

मिनिडोअर मॅजिक गाडीच्‍या अपघातात दोन ठार

sakal_logo
By

अलिबाग, ता. २१ (बातमीदार) : मांडवा-अलिबाग मार्गावर शनिवारी सकाळी मिनीअर मॅजिक गाडीचा अपघात झाला. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी आहेत. मांडव्यावरून प्रवासी घेऊन जाणाऱ्या या गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी रहाटले येथील पुलाखाली पलटी झाली. यात गाडीचे प्रचंड नुकसान झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील प्रवाशांना घेऊन मिनीअर मॅजिक गाडीमधून चालक मांडवा बंदर येथून अलिबागकडे निघाला होता. या गाडीत चालकासह नऊ जण होते. दरम्यान, रहाटले जवळ आल्यावर उतरणीजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी पुलाखाली नाल्यात पडली. त्यामध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले. मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजीव पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी अलिबाग व मुंबईच्या दवाखान्यात रवाना करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत गाडीतील चालक व एका महिला प्रवासी असा दोघांचा मृत्यू झाला. मात्र उर्वरित सात जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडीवरील स्टेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35769 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..