अलिबाग समुद्रकिनारी कचऱ्यामुळे अस्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबाग समुद्रकिनारी कचऱ्यामुळे अस्वच्छता
अलिबाग समुद्रकिनारी कचऱ्यामुळे अस्वच्छता

अलिबाग समुद्रकिनारी कचऱ्यामुळे अस्वच्छता

sakal_logo
By

अलिबाग, ता. २२ (बातमीदार) : अलिबाग समुद्रकिनारी दोन दिवसांपासून कचऱ्याचा ढिगारा साचला आहे. या कचऱ्याकडे पाहून पर्यटकांकडून नगरपालिकेच्या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहे. विल्हेवाट लावली जात नसल्याने या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. सुटीच्या दिवशी पर्यटक अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून दोन किमी अंतरावर असलेल्या समुद्रातील कुलाबा किल्ला, भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावणारा रणगाडा, तसेच समुद्राच्या लाटा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असतात. शनिवार व रविवारी दोन दिवस शासकीय सुटी आहे. या सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दोन दिवसांपासून अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. अलिबाग समुद्रकिनारी सागरी खेळांसह एटीव्ही बाईक, घोडा गाडी, सायकलमध्ये फिरून पर्यटक समुद्र सफरीचा आनंद घेत आहे. काही पर्यटक समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत आहे. दोन दिवसांपासून समुद्रकिनाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा पडलेला आहे. या कचऱ्यामुळे येथून जाणारे पर्यटक नाक मुरडत आहेत. अलिबाग समुद्रकिनारी कचराकुंडीतच टाकण्याचे फलक लावले असताना, दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी प्लास्टिक पिशवी, कागदी डीश, कपचा ढिगारा पडलेला आहे. या कचऱ्यामुळे पर्यटकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.
--------------------
अलिबाग समुद्रकिनारी पडलेला कचरा उचलणे गरजेचे आहे. याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम सोपवले आहे, त्याला तातडीने किनाऱ्यावर पडलेला कचरा उचलण्यास सांगतो.
- नामदेव जाधव, नगरपालिका, आरोग्य विभाग कर्मचारी

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35772 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top