कर्जतमध्ये विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जतमध्ये विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी
कर्जतमध्ये विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी

कर्जतमध्ये विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी

sakal_logo
By

कर्जत, ता. २४ बातमीदार ः कर्जत शहरातील विकास कामांसाठी नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्य पूर्ण या योजनेअंतर्गत ७ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून उद्यान, जीम, स्मशानभूमी, गटारे, रस्ते आदी विकासकामे केली जाणार असल्याची माहिती नगरसेवक संकेत भासे यांनी दिली.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून भासे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कामांसाठी निधीची मागणी केली होती. दहिवली समर्थनगर, पेट्रोलपंप भागातील विकास कामे मंजूर करून त्‍यापैकी काही प्रगतिपथावर तर काही पूर्ण झाली आहेत.
राज्याच्या नगरविकास विभागाने मंजूर केलेल्‍या ७ कोटी ८० लाखांच्या निधीतून कोतवाल नगरमध्ये हायमास्ट स्ट्रीटलाईट बसविणे, वाचन कट्टा उभारणे , ओपन जिम उभारणे , गुंडगे येथे समाज मंदिर, मुद्रे येथे संरक्षक भिंत आणि शेड उभारणे, म्हाडा कॉलनीत उद्यानाचे नूतनीकरण, मुद्रे आणि दहिवलीत स्मशानभूमी दुरुस्ती आणि सुशोभीकरण आदी विकास कामे करण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35800 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top