मागासवर्गीय शेतकऱ्यांना कृषी योजनेचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मागासवर्गीय शेतकऱ्यांना कृषी योजनेचा आधार
मागासवर्गीय शेतकऱ्यांना कृषी योजनेचा आधार

मागासवर्गीय शेतकऱ्यांना कृषी योजनेचा आधार

sakal_logo
By

अलिबाग, ता. २६ (बातमीदार) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनांतून ८९ शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी दिली असून, त्यासाठी एक कोटी ४८ लाख ६५ हजार रुपयांचा निधीला मान्यता मिळाली आहे.
मागासवर्गीय घटकातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावण्यासाठी, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्हा परिषदेने सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली. त्यामध्ये कृषी स्वावलंबन योजनेसाठी ८० लाख रुपये, तर कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गतसाठी) ६० लाख रुपये आणि क्षेत्राबाहेर २० लाख रुपयांची तरतूद आहे. २०२१- २०२२ या वर्षात जिल्ह्यातील ८९ लाभार्थी योजेनसाठी पात्र ठरले आहेत. कृषी स्वावलंबन योजनेसाठी ४६ लाभार्थी पात्र ठरले असून, त्यासाठी ८२ लाख २५ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच कृषी क्रांती योजनेसाठी एकूण ४३ लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यासाठी ६६ लाख ४० हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. या योजनेमधून जिल्ह्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना भात पिकांसह अन्य पिकांची लागवड करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. २०२२ - २०२३ या वर्षासाठी या योजनांसाठी नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकूटे यांनी केले आहे.

योजनेत सात बाबींचा समावेश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनांमध्ये नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअररिंग, पंप संच, वीजजोडणी आकार, शेततळ्याचे प्लास्टिक आस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सात बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35832 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top