
जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रमोद पाटील
अलिबाग, ता. २६ (बातमीदार) : रायगड जिल्हा मिनीडोअर चालक मालक संघटनेची नुकतीच पंचवार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अलिबाग तालुक्यातील वावे-अलिबाग जनसेवा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाटील गेली १७ वर्षे रायगड जिल्हा मिनीडोअर चालक मालक संघटनेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी पाच वर्षे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संघटनेत काम केले आहे. जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालक व मालक यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पाटील हे सध्या वावे-अलिबाग जनसेवा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी रक्तदान शिबिरे व रस्ते अपघातग्रस्तांना मदतकार्य केले आहे. तसेच, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ उपक्रमही राबवण्याचा प्रयत्न केला.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35838 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..