पाणीटंचाईचे संकट संपेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीटंचाईचे संकट संपेना
पाणीटंचाईचे संकट संपेना

पाणीटंचाईचे संकट संपेना

sakal_logo
By

अलिबाग, ता. ३० (बातमीदार) : जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. गावे, वाड्यांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. मागील १५ दिवसांपूर्वी सात तालुक्यांत पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. यात दोन तालुक्यांची भर पडली असून, अलिबागसह नऊ तालुक्यांतील २६५ ठिकाणी ही समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने समस्या दूर करण्यासाठी टंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला आहे. मात्र, तरीदेखील पाणीटंचाईचे संकट संपेना, अशी परिस्थिती झाली आहे.
जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम पाणी वितरणावर होऊ लागला आहे. नागरिकांना पावसाळा सुरू होईपर्यंत मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये काही गावांमध्ये दर दोन दिवस, तर काही गावांमध्ये चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. तरीही ग्रामीण भागातील नागरिक तहानलेलेच आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, खालापूर, पेण, महाड, सुधागड, पोलादपूर व श्रीवर्धन या तालुक्यांतील ४१ गावे, १८९ वाड्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून त्यांना २७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, हे पाणीसंकट संपेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये कर्जत व पनवेलचीही टंचाईग्रस्तामध्ये भर पडली आहे. त्यामुळे आता नऊ तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ सुरू झाला आहे. ४९ गावे, २१५ वाड्यांमध्ये सध्या ३३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
----------------------
धरणांमधील पाण्याचा साठा कमी झाला आहे. मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी बोअरवेल, विहिरी बांधणे, विहीर दुरुस्ती अशा अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. तसेच ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, तेथे टॅंकरद्वारे पुरवठा केला जातो.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता
ग्रामीण पाणी पुरवठा, रायगड जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35890 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top