आगामी निवडणुकांत काँग्रेस करिष्मा दाखवील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगामी निवडणुकांत काँग्रेस करिष्मा दाखवील
आगामी निवडणुकांत काँग्रेस करिष्मा दाखवील

आगामी निवडणुकांत काँग्रेस करिष्मा दाखवील

sakal_logo
By

पाली, ता. ३१ (वार्ताहर) ः आगामी सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने उतरून आपला करिष्मा दाखवेल, असा दृढ विश्वास काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केला. सुधागड तालुका काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पालीत संपन्न झाली. या वेळी घरत बोलत होते.
काँग्रेस पक्षाची विचारधारा राष्ट्रहिताची व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारी आहे. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनो, काँग्रेस पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन घरत यांनी केले. घरत पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पदयात्रा ऑगस्ट महिन्यात होणार आहे. रायगड किल्ल्यावरून ही पदयात्रा सुरू करण्याचा मानस आहे. काँग्रेस पक्षात इन कमिंग सुरू झाले असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने उतरणार आहे.या बैठकीत काँग्रेस पक्ष कमिटी सुधागड तालुका अध्यक्षपदी अनिरुद्ध (बाबा) कुलकर्णी यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. तालुका कमिटीतील इतर पदे निवडण्याचे अधिकार तालुका अध्यक्ष यांना या वेळी देण्यात आले.
...
शिबिरांचे आयोजन
१ आणि २ जूनला काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे नवसंकल्प शिबिर होणार आहे. त्यामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ११ ते १६ जूनला जिल्हास्तरावर नवसंकल्प शिबिर आयोजित करून जनतेच्या समस्या जाणून घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मंत्री व अध्यक्ष यांच्याशी थेट संवाद होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असे या वेळी घरत यांनी सांगितले.
...

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35902 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top