पावसाआधीच चविष्ट चिवणी दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाआधीच चविष्ट चिवणी दाखल
पावसाआधीच चविष्ट चिवणी दाखल

पावसाआधीच चविष्ट चिवणी दाखल

sakal_logo
By

पाली, ता. १ (वार्ताहर) : पावसाळ्यात खाडीकिनारी चिवणी मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागतात. यंदा पावसाच्या काही दिवस आधीच हे चविष्ट चिवणी मासे मिळू लागले आहेत. सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने खवय्ये आनंदीत झाले आहे. त्यांची चंगळ होणार असली, तरी हंगामाची सुरुवात असल्याने मासे मात्र महाग मिळत आहेत.
खाडीच्या मुखाच्या भागात चिवण्या अधिक प्रमाणात सापडतात. मात्र, खाडीकिनारे प्रदूषित झाल्याने चिवण्यांचे प्रमाण घटले आहे. तरीसुद्धा पावसाळ्यात चिवणी मासे मुबलक मिळतात. खाडीकिनारी हे मासे अंडी घालतात. पावसाच्या सुरुवातीला गाबोळी म्हणजेच पोटात अंडी असलेल्या चिवण्या अधिक सापडतात. अशा वेळी मासेमार व स्थानिक मोठ्या प्रमाणात चिवण्या पकडतात. सध्या या चिवणी माशांची आवक अलिबाग, पेण, उरण, पनवेल, पाली, रोहा आदी मासळी बाजारात काही प्रमाणात सुरू झाली आहे. सध्या आवक कमी असल्याने तब्बल ४०० रुपये किलो, ३०० ते ४०० रुपयांना मध्यम आकाराचे आठ ते १० मासे मिळत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी भाव वाढले आहेत.

-----------------
हंगामातील पहिलेच चिवणी मासे असल्याने मागणी खूप आहे. खवय्ये खरेदीसाठी तुटून पडत आहेत. पाऊस सुरू झाल्यावर आवक वाढल्यानंतर चिवण्या स्वस्त होतील. या माशांच्या अंड्यांना मोठी मागणी असते.
- गौरी मनोरे, मासळीविक्रेत्या, पेण-पाली

---------------------
चिवणी मासे खूप चविष्ट असतात. या मोसमात मिळणारे चिवणी मासे आवर्जून खातो. तळून किंवा कालवण करून हे मासे खाल्ले जातात.
- मनीष पाटील, खवय्ये, माणगाव

वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक रचना
चिवणीची त्वचा अतिशय चिकट व तेलकट असते. त्यामुळे तो हातात धरताना सटकतो. डोक्याजवळ टणक अणकुचीदार काटा असतो. त्यामुळे मासा सांभाळून पकडावा लागतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते.

साफ करण्याची कला
चिवनी साफ करण्यासाठी चुलीतील राखाडी वापरतात. ती नसेल तर तांदळाचे पीठ वापरतात. डोक्याजवळील काटा हातात राखाडी घेऊन मोडावा लागतो. काहीजण तो सुरी किंवा विळीने कापून टाकतात.

पाली : विक्रीसाठी आणलेले चिवणी मासे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35947 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top