
सुधागड तालुक्यातून बाईक रॅली
पाली, ता. २ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती मंगळवारी (ता. ३१) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सुधागड तालुका धनगर समाजातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन तालुक्यातून भव्य बाईक रॅली काढून अहिल्यादेवींना मानवंदना दिली. अतिशय कर्तबगार व कुशल प्रशासक असलेल्या अहिल्यादेवींबद्दल जनजागृती करण्यासाठी सुधागड तालुका जय मल्हार धनगर समाजाने बाईक रॅलीचे आयोजन केले होते. बाईकवर पिवळे झेंडे लावून सकाळी १० वाजता पालीतील मराठा समाज सभागृह येथून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर गौळमाळ धनगरवाडा येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गावातून रॅली काढण्यात आली. या वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
पाली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढलेली बाईक रॅली.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35948 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..