पाली-बोरिवली एसटी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाली-बोरिवली एसटी सुरू
पाली-बोरिवली एसटी सुरू

पाली-बोरिवली एसटी सुरू

sakal_logo
By

पाली, ता. ५ (वार्ताहर) ः पाली-बोरिवली बस सेवा दोन वर्षांपासून बंद होती; परंतु ही बस सेवा सुरू व्हावी याकरिता सुधागड-रोहा नवगाव मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. अदिती तटकरे यांनी निवेदनाची दखल घेत पेण एसटी महामंडळ आगाराला पाली ते बोरिवली एसटी सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही बस सेवा सुरू झाली आहे.
कोरोना काळात पाली ते बोरिवली बस सेवा बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महाराष्ट्रात एसटी सेवा पुन्हा सुरू झाली, मात्र पाली बोरिवली बस सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन सुधागड रोहा नवगाव मराठा समाजाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष विनोद पार्टे, कार्याध्यक्ष भालचंद्र भणगे, सचिव राजेंद्र उतेकर आदी पदाधिकाऱ्यांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

अशी धावते बस
पाली (सुधागड) येथून दुपारी ३.१५ वाजता बोरिवलीकरीता, तसेच सकाळी ५.४५ वाजता बोरिवली येथून पाली (सुधागड) करिता एसटी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाली बस स्थानकातून देण्यात आली आहे. तसेच बसचा मार्ग पाली-नागोठणे-पेण-पनवेल-सायन-अंधेरी-गोरेगाव-बोरिवली असा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36004 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top