सुधागड तालुक्यातील पोरं हुशार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधागड तालुक्यातील पोरं हुशार
सुधागड तालुक्यातील पोरं हुशार

सुधागड तालुक्यातील पोरं हुशार

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) : सुधागड तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.२१ टक्के लागला असून, रायगड जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. पालीतील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या ग. बा. वडेर हायस्कूल आणि व. ग. ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयातील समीक्षा तळेकर ही वाणिज्य शाखेतून ८७.५० टक्के मिळवून अव्वल आली आहे. तर विज्ञान शाखेतून जय बारस्कर ८६.८३ टक्के मिळवून अव्वल आला आहे. विदिशा वाघमारे ८३.६७ टक्के मिळवत कला शाखेत अव्वल ठरली आहे.
तालुक्यातील जांभूळपाडा एस.ए.एस.एस. आत्मोंनत्ती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर नांदगाव संत नामदेव माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल ९५.८३ टक्के लागला. तसेच बल्लाळ विनायक प्रशाला व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के लागला. अनुदानित आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज वावळोलीचा निकाल १०० टक्के लागला. श्री राज एज्युकेशन सेंटर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातून १२ वीच्या परीक्षेत ६६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्‍यामध्ये ३८९ मुले आणि २७१ मुलींचा समावेश आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेत सुधागड तालुक्यात मुलींपेक्षा मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तहसीलदार दिलीप रायअन्नावर, गटविकास अधिकारी विजय यादव, गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास व पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सुधागड तालुक्यातून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला, याचा खूप आनंद झाला आहे. या यशाचे श्रेय आई-वडील, आजी, दादा आणि माझ्या क्लासेसचे संचालक संतोष भोईर यांना, तसेच माझ्या सर्व शिक्षकांना देते. यापुढे मी पुणे येथून बीबीए करून मार्केटिंग क्षेत्रामध्ये एमबीए करणार आहे.
- समीक्षा शेखर तळेकर, वाणिज्य, प्रथम क्रमांक

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36072 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top