निधीअभावी रखडले सीसीटीव्हीचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधीअभावी रखडले सीसीटीव्हीचे काम
निधीअभावी रखडले सीसीटीव्हीचे काम

निधीअभावी रखडले सीसीटीव्हीचे काम

sakal_logo
By

अलिबाग, ता. १५ (बातमीदार) ः अलिबाग शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. त्यामुळे नागरिक, तसेच त्‍यांच्या मालमत्तेच्या ठिकठिकाणी सीसी टीव्ही बसवण्याचा प्रयत्न अलिबाग नगरपालिकेकडून सुरू आहे. शहरातील मुख्य चौक, बॅंक, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार असून त्‍यासाठी २६ लाखांचा निधी अपेक्षित आहे. नगरपालिकेने जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी मागणी केली आहे; परंतु अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने सीसी टीव्ही बसविण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांसह त्‍यांच्या मालमत्तांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
अलिबाग समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने आठहून अधिक सीसी टीव्ही बसविले आहेत. मात्र अलिबाग शहरामध्ये मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत. शहरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लहान-मोठे व्यवसायासह मुंबई-पुण्याच्या धर्तीवर मोठमोठे मॉल उभे राहत आहेत. पादचाऱ्यांसह दुचाकी, अन्य वाहनांची वर्दळ वाढली आहे. शहरात बॅंकासह एटीएमची सुविधा वाढू लागली आहे.
जिल्ह्यासह विभागीय व तालुका स्तरावरील शासकीय कार्यालये आहेत. नगरपालिकेने शहर सीसी टीव्हीच्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याचा पुढाकार घेतला आहे. यामुळे शहरात होणाऱ्या चोऱ्या, महिलांची छेडछाड अशा अनेक गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नगरपालिकेला २६ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे, मात्र अद्याप निधी उपलब्‍ध न झाल्‍याने सीसी टीव्ही बसविण्याचे काम रखडले आहे.

सीसी टीव्ही बसविण्यासाठी अलिबाग नगरपालिकेने २६ लाख रुपयांची मागणी गतवर्षी केली होती; परंतु कोरोनामुळे पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने निधी वितरित करणे शक्य झाले नाही. नगरपालिकेने पुन्हा प्रस्ताव सादर करावा.
- जयसिंग मेहेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी

नागरिक व त्‍यांच्या मालमत्तांच्या सुरक्षेसाठी शहरात सीसी टीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाल्यास तातडीने कामाला सुरुवात केली जाईल.
- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी
अलिबाग नगरपरिषद.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36119 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top