
क्रीडा मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : सेलिब्रिटी, राजकारणी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी ओळख लपवून वावरतात. त्यामुळे आजूबाजूने जाणाऱ्यांचेही त्यांच्याकडे लक्ष नसते. अशाच प्रकारे नेहमी कार्यकर्त्याच्या आणि सुरक्षा रक्षकांच्या घोळक्यात फिरणारे राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार सोमवारी सायंकाळी अलिबाग येथील वरसोली समुद्रकिनारी कुटुंबासोबत पर्यटनाचा आनंद घेत होते. याचवेळी मैदानी सराव करणाऱ्या स्पर्धा विश्व अॅकॅडमीच्या विद्यार्थांनी त्यांना ओळखले. केदार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
समुद्रकिनारी विद्यार्थ्यांचा सराव पाहून क्रीडामंत्री प्रभावित झाल्याने त्यांनी स्वतःहून विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्याचा उपयोग आम्हाला स्पर्धा परीक्षेत मैदानी गुण वाढविण्यासाठी होईल, असा विश्वास या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. खासगी दौरा असल्याने केदार याच्याबरोबरच सुरक्षारक्षक किंवा कार्यकर्त्यांचा गलका नव्हता.
पावसाळी ढगाळ वातावरणामुळे वरसोली समुद्र किनारी पर्यटकांचीही गर्दी होती. क्रीडा क्षेत्रात मागील अनेक वर्ष काम करणाऱ्या तपस्वी गोंधळी यांनी सुनील केदार यांना लगेच ओळखले. केदार यांनीही प्रतिसाद दिल्याने क्रीडामंत्र्यांबरोबर सेल्फी काढत हा आनंद द्विगुणीत केला. क्रीडा क्षेत्राशी काही अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही केदार यांनी केले असून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36137 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..