लसीकरण न झालेल्यांना शोधण्यासाठी ‘हर घर दस्तक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण न झालेल्यांना शोधण्यासाठी ‘हर घर दस्तक’
लसीकरण न झालेल्यांना शोधण्यासाठी ‘हर घर दस्तक’

लसीकरण न झालेल्यांना शोधण्यासाठी ‘हर घर दस्तक’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर दस्तक’ मोहीम रायगड जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहे. शाळा नुकत्याच सुरू झाल्या असल्याने कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुन्हा पसरू नये यासाठी आरोग्य विभाग खबरदारी घेत किशोरवयीन मुलांच्याही लसीकरणाला वेग देणार आहे. घरोघरी जाऊन तसेच दूरध्वनी आणि लघुसंदेशाच्या माध्यमातून लसीकरण न झालेल्या नागरिकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
मंगळवारी एकाच दिवशी रायगड जिल्ह्यात ११४ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, मागील पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिल महिन्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची सरासरी ५० च्या आसपास होती, ती अचानक वाढून ६४१ इतकी झाली आहे. यामुळे कोरोना पुन्हा जोर धरतो की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, कोरोनाचा प्रादुभाव वाढणाऱ्या तालुक्यांमध्ये ही मोहीम अधिक प्रभाविपणे राबवली जात आहे. शाळा सुरू झाल्या असल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये म्हणून लसीकरण न झालेल्या नागरिकांना शोधून काढण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर नागरिकांचे लसीकरणासाठी प्रबोधन, कोरोनाची माहिती दिली जात आहे.
काही नागरिकांनी अद्यापही पहिला आणि दुसरा डोस घेतलेला नाही. अशा नागरिकांना शोधून त्यांचे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रबोधन करावे लागत आहेत. लसीकरण मोहीम मंदावल्याने कोरोना रुग्णसंख्येतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सध्या एक लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली नसल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. त्यातच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात पुन्हा वाढत असल्याने या मोहिमेला पुन्हा गती देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

युरोपियन देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. दिल्लीपाठोपाठ आता राज्यातही रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. ही थांबवण्यासाठी प्रबोधनाबरोबरच लसीकरण होणे गरजेचे होते. हे महत्त्वपूर्ण काम या मोहिमेतून केले जात असून आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन लस न घेणाऱ्या नागरिकांची चौकशी करीत आहेत. या मोहिमेतून लसीकरणासंदर्भातील परिपूर्ण माहिती संकलीत होईल.
- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36155 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top