विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या ५१६ फेऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या ५१६ फेऱ्या
विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या ५१६ फेऱ्या

विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या ५१६ फेऱ्या

sakal_logo
By

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. १५ ः जिल्ह्यात बुधवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या रायगड विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या ५१६ फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या बसफेऱ्यांमुळे एकूण १० हजार ३७६ किलोमीटरचा प्रवास होणार आहे. त्‍यामुळे शहरासह ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या एसटी फेऱ्यांचा आधार होणार आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण तीन हजार ६८७ शाळा आहेत. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागात खेड्यापाड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी सवलत दिली जाते. जवळपास दीड वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, खेड्यापाड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत वेळेवर पोहचता यावे यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाने खास विद्यार्थ्यांसाठी एसटी फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरूड, रोहा, माणगाव, महाड, श्रीवर्धन, कर्जत या आठ आगारातून एसटी फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

मुलींसाठी अहिल्‍याबाई होळकर योजना
विद्यार्थ्यांसाठी सवलत लागू करण्यात आली असून यात पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर ही योजना सुरू केली आहे. तसेच अन्य विद्यार्थ्यांसाठी पास सवलत सुरू केली आहे. या योजनांमुळे विद्यार्थी कमी खर्चात शाळेपर्यंत पोहचू शकतील.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील स्थानक प्रमुखांची बैठक घेण्यात आली. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शाळेच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नियमित शाळेत जाता यावेत यासाठी ही सेवा सुरू केली असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सेवेचा लाभ घ्यावा.
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक,
एसटी महामंडळ, रायगड.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36158 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top