जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट
जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट

जिल्ह्यातील शाळांमध्ये किलबिलाट

sakal_logo
By

अलिबाग, ता. १५ (बातमीदार) ः जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या शाळा बुधवारपासून प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे खाऊ व गुलाब पुष्प देऊन तसेच दिंडी, प्रभात फेरी काढून स्वागत करण्यात आले. कोरोना काळात शाळा ऑनलाईन सुरू होत्या. परंतु नव्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्षात शाळेतील वर्ग भरल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळांना १२ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली होती. १३ जूनपासून शाळा सुरू होणार होत्या. परंतु कोरोनाने राज्यात पुन्हा डोकेवर काढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा सुरू १५ जूनला सुरु झाल्या. तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शाळेत हजर होण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले. त्यानुसार शाळा सुरू झाल्या. शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला गावांमध्ये प्रभात फेरी, प्रवेश दिंडी काढून शाळेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. शाळेची रंगरंगोटी, फुलांनी सजावट करण्यात आली. वेगवेगळ्या महापुरुषांचे चित्र काढण्यात आले. तर काही शाळांमध्ये चालता बोलता शिकता यावे यासाठी भिंतीवर अंक गणित, फळ, फुले, प्राण्यांचे चित्र काढण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी पहिल्या दिवसापासून अभ्यासाचे धडे न देता त्यांच्या आवडीचे खेळ घेण्यात आले. मनोरंजनासारखे उपक्रम राबवल्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील शाळांमधील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, शिक्षक स्नेही आदींनी सहभाग घेतला होता. काही शाळांतील शिक्षकांनी गृह भेटी देऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले.
---------------------

१५ जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी अभ्यास वर्गापेक्षा सुरुवातीला योगासने, प्राणायम सारखे उपक्रम राबविण्याचा मानस आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

पुनीता गुरव - शिक्षणाधिकारी
रायगड जिल्हा परिषद- प्राथमिक विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36179 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top