वांगणी हायस्कूलच्या पंचकन्या चमकल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांगणी हायस्कूलच्या पंचकन्या चमकल्या
वांगणी हायस्कूलच्या पंचकन्या चमकल्या

वांगणी हायस्कूलच्या पंचकन्या चमकल्या

sakal_logo
By

पाली, ता. १९ (वार्ताहर) : सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगणी या शाळेने दहावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. यावर्षीही या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पहिल्या पाच क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या पाचही मुलींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादित केले आहे. त्यामुळे या ''पंचकन्यां''चे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रथम क्रमांक रिया मोरे (९२.२० %), द्वितीय पायल भोसले (९० .८० %), तृतीय प्रज्ञा सुतार (८६.८०%), चतुर्थ श्रुती जाधव (८६.४० %) आणि पाचवा क्रमांक सानिका भिसे (८३. ६० %) हिने मिळविला आहे. रिया मोरे ही नागोठणे केंद्रात पहिली आली आहे. ही शाळा ग्रामीण भागात असून कोणतीही खासगी शिकवणी न लावता या मुलींनी हे देदीप्यमान यश मिळवले आहे. शिवाय, या मुलींच्या घरची परिस्थिती बेताची आहे.
कोरोनामुळे उशीरा सुरू झालेल्या शाळा, तसेच कोरोना संक्रमणामुळे धास्तावलेले पालक व विद्यार्थी या सर्व गोष्टींवर प्रभावीपणे मात करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन केले. जादा अभ्यास वर्ग व भरपूर सराव परीक्षा घेतल्या. शाळेचे मुख्याध्यापक जयहिंद ठाकूर, दहावीचे वर्गशिक्षक व गणित विज्ञान शिक्षक टिळक खाडे, तसेच विषय शिक्षक अरविंद शेळके, नरेंद्र पाटील, विकास म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या या यशाबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, कार्याध्यक्षा गीता पालरेचा, सचिव रवीकांत घोसाळकर, तसेच स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष मधुकर ठमके, रोहा पंचायत समिती सदस्य संजय भोसले, माजी सभापती सदानंद गायकर, शाळा समिती सदस्य सुरेश शिनगारे, अनंत कोतवाल, हरिश्चंद्र तेलंगे, चंद्रकांत जांबेकर आदी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36234 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top