शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी योग सर्वोत्कृष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी योग सर्वोत्कृष्ट
शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी योग सर्वोत्कृष्ट

शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी योग सर्वोत्कृष्ट

sakal_logo
By

अलिबाग, ता. २१ (बातमीदार) : आपल्या पूर्वजांनी योगसाधना अमूल्य देणगी दिली आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योग आणि प्राणायाम करावे. ही देणगी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील पोलिस कवायत मैदानात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास आणि प्रात्यक्षिके घेण्यात आले. त्या वेळी अशोक दुधे बोलत होते. धावपळीच्या जीवनात आपल्याला आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे मानसिक व शारीरीक आरोग्य बिघडण्याचा धोका अधिक असतो. योग हे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे योग प्रत्येकाने केले पाहिजे, असे मार्गदर्शन करताना दुधे यांनी सांगितले.
या वेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी फणीकुमार, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व ॲकॅडमीच्या सुचित्रा साळवी, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला उपस्थित होते.

क्रीडा व प्रश्नमंजूषा स्पर्धा
आंतराराष्ट्रीय योगदिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी क्रीडा व प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा विश्व ॲकॅडमी, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सहकार्याने धावणे, गोळाफेक, लाठीकाठी, प्रश्नमंजूषा आदी स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये शहरातील युवक-युवतींनी सहभाग घेतला. विजेत्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देवून सन्मान करण्यात आला. या वेळी ॲमॅच्युर असोसिएशन रायगड या संस्थेच्या मुलामुलींनी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा आदी प्रात्यक्षिके सादर केली. प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने शहरात पथनाट्याद्वारे योगाविषयी जनजागृती व प्रचार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36280 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top