
कर्जतमधून सर्वाधिक रक्तदान
कर्जत, ता. २३ (बातमीदार) : कर्जत-खालापूरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ४५२ रक्तदान शिबिरे राबविले गेली आहेत. यामध्ये हजारांपेक्षा अधिक रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले, अशी माहिती रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांनी दिली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जत व लायन्स क्लब ऑफ कर्जत डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते.
कर्जतमधील दाते नेहमी रक्तदानास योगदान देण्यासाठी पुढाकार घेत असतात. सर्वाधिक रक्त हे कर्जतमधून जात असल्याने अनेकांचे प्राण वाचले आहे. आजच्या शिबिरातही ५३ जणांनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले, असे कोठारी यांनी सांगितले. या शिबिरात गणेश ठोसर यांनी ११०वे रक्तदान करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ कर्जत डायमंडच्या अध्यक्षा ॲड. गायत्री पेठे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कर्जतचे अध्यक्ष आशीष गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुग्धा ठोसर, संगीता गोडबोले, डॉ. शारदा नीवाते, संपदा ढाकवळ, अभिजित मराठे, नीलेश परदेशी, पंकज शाह, किशोर वैद्य, गणेश ठोसर, दत्ता खंडागळे, मिलिंद खंडागळे, मोहन पेठे, जयदीप देऊसकर, प्रशांत उगले, जयवंत म्हसे, प्रभाकर करंजकर, प्रकाश शाह, संजय वाझरेकर, सुनील सोनी, सुनील गोगटे, साईनाथ श्रीखंडे, प्रसाद बुवा पाटील उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b36311 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..